Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahatma jyotirav phule shetakari loan free scheme ] : राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये , तब्बल 5216/- कोटी 75 लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात राज्य शासनांकडून मंजूर देण्यात आली आहे .

आधार प्रमाणीकरण असणाऱ्या राज्यातील 14 लाख  38 हजार पात्र शेतकऱ्यांना 5216 कोटी लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आली आहे . अद्याप राज्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी 33,356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्या कारणांने सदर शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत प्रोत्साहपर लाभ अदा करण्यात आलेला नाही , अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवपास असणाऱ्या आपले सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे निर्देश सहकार विभागांकडून देण्यात आले आहेत .

पीक कर्जाची नियमित पणे परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 अंतर्गत सहकार विभागच्या दिनांक 29.07.2022 रोजीच्या निर्णयाद्वारे अंमलबजावणी करण्यात आली . तसेच सन 2017-18 , सन 2018-19 व सन 2019-20 या 03 वर्षांपैकी कोणत्याही 02 वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत रुपये 50,000/- पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहेत .

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

सदर योजना अंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकुण 29 लाख 02 हजार कर्ज खात्यांची माहिती सदर योजना पोर्टलवर सादर करण्यात आलेली आहे . तर यापैकी 04 लाख 90 हजार कर्जखाते हे आयकर दाते व पगारदाते असल्या कारणांने सदर अर्ज हे अपात्र ठरविण्यात आलेली आहेत . तर 8 लाख 49 कर्जखाते पीक कर्जाची 03 आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच वर्षात परफेड केल्या , कारणांने सदर अर्ज हे अपात्र ठरविण्यात आलेली आहेत .

पात्र ठरविण्यात आलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांकित करण्यात आले असून , त्यापैकी एकुण 15 जाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरणे करण्यात आलेले आहेत . तर प्रमाणीकरण करण्यात आलेल्या कर्ज खात्यांपैकी एकुण 14 लाख 40 हजार कर्ज खात्यांकरीता 5222 कोटी 5 लाख इतकी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे . सदर मंजूर रक्कमेपैकी एकुण 14 लाख 38 हजार खातेदारांना एकुण 5216 कोटी 75 लाख रुपये इतके रकमेचे वितरण करण्यात आल्याचे सहकार विभागांकडून कळविण्यात आलेले आहेत .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *