Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahashtra state employee old pension scheme Hunger Stike update ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटी / शर्तीशिवाय जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणावर बसले आहेत .
सदर उपोषणांची दखल घेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी राज्याचे मा.ना. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्या प्रति दिनांक 05.10.2024 रोजी पत्रक सादर केले आहेत .
सदर पत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 02 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती पासून महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळावी या मागणीकरीता वर्धा या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केले आहेत .
याबाबत माहिती घेतली असता , उपोषणांचा चौथा दिवस असून त्यातील संजय सोनार या उपोषण कर्त्या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आल्याचे समजले . तसेच इतर उपोषण कर्त्यांची तब्येत सुद्धा खालावत आहे , आणि सदर उपोषण कर्ते आजपासून पाणी देखिल न पिण्याच्या संकल्प करीत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
यामुळे सरकारने पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करुन त्यातुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे , परंतु नविन लागु करण्यात आलेली UPS ही पेन्शन येाजना कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विश्वासक नसून त्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना जशीच्या तशी कशी देता येईल याबाबत , त्यांच्या मागणीचा सहानुभूती पुर्वक विचार करुन त्यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढवा अशी विनंती करण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.