Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharastra new havaman andaj , rain Update ] : राज्यामध्ये पावसाचा मुक्काम दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे , यानुसार राज्यामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली , तर पाऊस दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्र , कोकण उत्तर महाराष्ट्र विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
सदरच्या काळामध्ये राज्यातील छत्रपती संभाजी , अहमदनगर , नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार त्याचबरोबर सातारा , सांगली कोल्हापूर ,पुणे या भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे . तसेच दि.14 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार आहे .
तर राज्याचा एकंदरीत विचार केला असता , दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून वर्तविण्यात आलेला आहे . यापूर्वी राज्यामध्ये दि.17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अहमदनगर , जळगाव , नाशिक, धुळे , नंदुरबार ,लातूर ,बीड , कोल्हापूर , धाराशिव ,सातारा ,सांगली, सोलापूर ,पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
तर सदरच्या काळामध्ये विदर्भ विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . एकंदरीत राज्यामध्ये 21 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम राहणार आहे . त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार आहे .