Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Weather Update News ] : राज्यातील पुणे हवामान अंदाज वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार , राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची मोठी शक्यता आहे , तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा अधिकच चढणार आहेत .

माहे फेब्रुवारी पासुन विदर्भ व मराठवाड्यांमध्ये तापमानाचा पारा अधिकचा वाढला आहे , यामुळे बाष्पीभवन होवून विदर्भ व मराठवाड्यांमध्ये दरवर्षी अवकाळी पाऊस पडता असतो . सध्या मराठवाडा व विदर्भा मधील जवळपास सर्व राज्यातील थंडीच प्रमाणे पुर्णपणे कमी झालेले आहेत . यामुळे तापमानाचे प्रमाणे अधिक वाढले आहेत . मागील आडवड्यांमध्ये विदर्भाच्या भंडारा , नागपुर , अकोला , वाशिम , बुलढाणा जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडला होता .

तर पुणे वेधशाळेच्या पुन्हा एकदा दिलेल्या माहितीप्रमाणे , कोकण विभाग व्यतिरिक्त राज्याच्या सर्वच भागांमध्ये तुरळ ठिकणी हलक्या प्रमाणात पुढील काही दिवसांत पाऊस पडण्याची मोठी शक्यता वर्तविली आहे . तर विदर्भ व मराठवाड्यात पुढील 4-5 दिवसांमध्ये कोरडं राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . हिमालयातील बर्ष वितळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणत होत असल्याने राज्यात 21 तारखेपर्यंत उत्तरी भागातील वाऱ्यांमुळे तापमानांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

देशातील हवामानाचा अंदाज : देशातील हवामानाचा विचार केला असता , हवामान अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये हवामानांमध्ये मोठा बदल होणार आहे , पाऊस तसेच गारपिटांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ,याचा परिणाम राजधानी दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये परिणाम दिसुन येणार आहेत .

उत्तर भारतांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहेत तर हिमाचल , जम्मु , लडाख , गिलगीट या भागांमध्ये मध्यम प्रकारची पाऊस तर काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची मोठी शक्यता भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *