राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात , या दिवशी निवडणूक तर दिवाळीनंतर निकाल ; जाणून घ्या आयोगाची माहिती !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election update ] : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचा 02 दिवसीय दौरा पूर्ण केला आहे , यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे .

राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे . त्या अनुषंगाने राजाच्या निवडणुका पार पडणार आहेत , याकरिता पुढील दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे .  सदर कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याकरिता निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत .

मागील सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता , दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले , तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आले . या अनुषंगाने विचार केला असता 2024 मधील विधानसभा निवडणुका कार्यक्रम 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत पार पाडण्यात येईल .

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या शनिवारी पत्रकार परिषद घेऊन , राजाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आचारसंहिता याबाबत प्रसिद्धी दिली जाईल , अशी माहिती समोर येत आहे . मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये , मतदान प्रक्रिया होऊ शकते त्यानंतर पाच दिवसानंतर निकाल जाहीर करण्यात येईल .

सदर निवडणुका दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये होणार असल्याचे संकेत समोर येत आहे , कारण निवडणुका कार्यक्रम बहुदा शाळा , महाविद्यालय मध्ये पार पडले जातात . दिवाळी सुट्टी मध्ये सदर शाळा , महाविद्यालय बंद असतात . जेणेकरून निवडणूक कामकाजासाठी अधिक सोयीस्कर होते . यामुळे दिनांक 24 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राजाच्या विधानसभा निवडणुका पार पडतील असा अंदाज आहे .

Leave a Comment