Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election result ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 चा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला आहे , यांमध्ये महायुती पक्षाला चांगला यश मिळाले आहे . तर महाविकास आघाडी पक्षाला मोठी हार पत्कारावी लागली आहे .
निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला एकुण 132 जागा , शिवसेना ( शिंदे गट ) 57 जागा , राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) 41 जागा मिळाल्या आहेत . तर महाविकास आघाडी मध्ये शिवसेना ( ठाकरे गट ) 20 जागा , काँग्रेस 16 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शदर पवार ) गटाला 10 जागा मिळाल्या आहेत . तर इतर पक्ष व अपक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत .
आपल्या मतदार संघानिहाय कोणाला किती मत मिळाले ? तसेच किती मताने विजयी झाले ? याबाबतची सविस्तर प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
सर्व प्रथम https://results.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करावेत , त्यांमध्ये आपणांस राज्याचे विधानसभा निकाल पक्षनिहाय दर्शविण्यात येईल . यांमध्ये आपणांस आपल्या मतदार संघानिहाय निकाल पाहण्यासाठी Constituency Wise Results या ऑप्शन मध्ये आपली Constituecy ( मतदारसंघ ) Select करायचे आहेत .
आपल्या मतदार संघाचे नाव सलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या मतदार संघामध्ये किती उमेदवार उभे होते ? कोणत्या उमेदवार निवडुन आला ? किती मताने निवडून आले ? व किती मत मिळाले याबाबतचा सविस्तर तपशिल दिसेल ..