Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election program declare] : राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र राज्याचा 02 दिवसीय दौरा निश्चित करण्यात आला आहे . या अनुषंगाने राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच पार पडण्याच्या संभावना  आहेत .

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक 27 व 28 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचा दौरा निश्चित करण्यात आला आहे .  यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामधील प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक राज्याला भेट देणार आहे . यामुळे विधानसभा निवडणुकासाठी ग्रीन सिग्नल लागले आहेत . याशिवाय राज्य सरकारने निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे विविध, प्रमाणपत्रे , फॉर्म इत्यादी कागदपत्रे छपाई करण्यासाठी मान्यता दिली आहे .

यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे . पहिल्या यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे . तर यामध्ये एका तृतीय पंथीय उमेदवाराची रावेर मतदारसंघातून निवड केली आहे .

त्याचबरोबर सध्याची विधानसभा निवडणुका मराठा आरक्षण , धनगर समाज आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण बचाव या मुद्द्यावर अधिकच रंगणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे . प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी मतदान करणार असल्याचा अंदाज आहे .याशिवाय सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन मागणी करिता आपले मत सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोंदवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .

सूत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार असल्याची शक्यता आहे याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होण्याच्या संभावना आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *