महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 चे संभाव्य वेळापत्रक ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election expected date ] : महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचा कार्यकाळ पुढील तीन महिन्यांमध्ये संपणार आहे , याकरीता विधानसभा निवडणुका 2019 च्या अधिसुचनानुसार , संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत .

मिडीया रिपोर्ट नुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे , राज्याच्या सन 2019 च्या विधानसभा निवडणुका अधिसुचनेनुसार , आचार संहिता दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी लागेल , तर थेट मतदान हे दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी होईल तर मताची मोजणी ही दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 रोजी होण्याची संभाव्य वेळापत्रकांमध्ये नमुद आहेत .

सदर संभाव्य वेळापत्रकानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तसेच निवडणुकीचे कामकाजास लवकरच सुरुवात होणार आहे . तसेच राज्यातील सर्व पक्षांकडून निवडणुकीसाठी रंगत सुरु झाली आहे .काही उमेदवार विविध पक्षांकडून उमेदवारासाठी धावपळ करत असताना दिसुन येत आहेत . तर काही जन आपले वर्चस्व कायम टिकुन रहावे याकरीता दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश घेत आहेत .

सन 2019 रोजीच्या अधिसुचनेनुसार राज्यांत दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी  विधानसभेचे प्रत्यक्ष मतदान होणार आहेत . यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आचार संहिताच्या लागणार असल्याने आता प्रत्यक्ष निवडणुकीस 93 दिवस शिल्लक राहीत व आचार संहिताला आज रोजी 69 दिवस शिल्लक राहीले आहेत .

या दृष्टीने सर्व पक्षांकडून सर्वोपरी तयारी करण्यात येत आहेत . पक्षांकडून आपापल्या पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर करणे , उमेदवार निश्चित करणे इ. कामकाज सर्व पक्षांकडून सुरु आहेत .

Leave a Comment