Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra swarajya paksha] : पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत,  त्या अनुषंगाने राज्यामध्ये नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे . सदर पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवानगी देखील देण्यात आली असून , सदर पक्षाला चिन्हही देण्यात आले आहेत .

दिनांक 09 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना झालेली होती , सदर संघटना शेतकरी , कष्टकरी यांच्या विविध प्रश्नाकरिता वेळोवेळी लढा दिला आहे . सदर संघटनेच्या वतीने मराठा आरक्षण या मुद्द्यावर अधिक भर दिल्यामुळे , राज्यभर सदर संघटनेची प्रसिद्धी झाली असून , सदर संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या राजकीय पक्ष नावाने ओळखला जाणार आहे .

“महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक जोमाने लढणार असल्याची माहिती समोर येत आहे . विधानसभेच्या सर्व जागेवर सदर पक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती संभाजी राजे यांनी दिली आहे , सदर पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली असून ,  सदर पक्षाला “सप्तकिरणासह पेनाची निब”  हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांनी सदर पक्षाची स्थापना केली आहे , यामुळे राज्यभर मराठा समाज सदर पक्षाच्या छायेखाली येण्याची शक्यता आहे . तर सदर पक्षाच्या छायेखाली मनोज जरांगे पाटील देखिल निवडणूक लढू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील हे निवडणूक रिंगणात लढणार आहेत , परंतु त्यांचा निवडणुकीचा अद्याप विचार नसल्याचे स्पष्ट झालेला नाही . तर सदर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या पक्षाच्या छायेखाली मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवू शकतील , असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

संभाजी राजे , बच्चू कडू , प्रकाश आंबेडकर असे मिळून तिसऱ्या परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सहभागी झाले आहे , सदर परिवर्तन महाशक्ती आघाडीची नुकतीच जाहीर सभा संपन्न झाली आहे . यामुळे संभाजी राजे सदर पक्ष महाविकास आघाडी व महायुती पासून वंचित राहून निवडणुका लढवणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *