Live marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state zp / m.corporation anudan paripatrak ] : सन 2024-25 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त अनुदान वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई मार्फत दिनांक 05.09.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार सन 2024-25 मध्ये सर्वात वरची इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकुण 63010 शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकुण रुपये 16307.25 लाख रुपये तरतुद मंजूर करण्यात आलेली आहे . तसेच सर्वात वरची इयत्ता 10 वी अथवा 12 वीचा वर्ग असणाऱ्या एकुण 1771 शासकीय स्थानिक संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकुण रुपये 1031.40 लाख रुपये निधीची तरतुद मंजूर करण्यात आलेली आहे .
जिल्ह्यांना / महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात येईल , तसेच जिल्ह्याच्या , तालुक्याच्या एकुण मंजूर तरतुदीच्या मर्यादेत व शाळांना मंजूर असणाऱ्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च करण्यात येईल , याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये जिल्हानिहाय निधी वितरणांचा तपशिल नमुद करण्यात आलेला आहे , त्यानुसार निधीचे खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचा निधी हा सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेल्या बाबींकरीताच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
ज्यांमध्ये शाळा व्यवस्थापनात वाढ , इमारत देखभाल , तसेच रंगरंगोटी इ. बाबींचा समावेश आहे . याबाबतचा सविस्तर अनुदान परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.