Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state zp employee one increment after pramotion letter ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देणेबाबत , ग्रामविकास विभागाकडून दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतननिश्चिती करताना एक वेतन वाढ दिल्यास , येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विहित प्रपत्रात ग्राम विकास विभागाकडून मागविण्यात आलेली आहे .

सदरच्या प्रकरणी नमूद केली आहे की , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांक पासून देय आहे , अगर दिनांक 26 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयाच्या दिनांक पासून देय आहे , याबाबत अनेक जिल्हा परिषदा कडून मार्गदर्शन करिता पत्रव्यवहार सादर करण्यात आले आहेत .

त्या अनुषंगाने सदरहू पदांना पदोन्नतीच्या दिनांक पासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने , त्याकरिता शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती आवश्यक असल्याने , राज्यातील सर्व जिल्हा परिषदा यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे . सद्यस्थितीत बऱ्याच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 11 (1) अ नुसार , पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन वाढ देण्यात येत असल्याचे , शासनाच्या निदर्शनास येत आहे. 

तरी ज्या जिल्हा परिषद कार्यालयाकडून यापूर्वीच वेतन वाढ लागू केली असल्यास , तसा अहवाल विहित नमुन्यात दिनांक 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *