विधानसभेत मविआचा जागा वाटपाच्या फॉम्युलांमध्ये काँग्रेस 100 तर , ठाकरे गटाला 95 व शदर पवार गटाला 85 जागा मिळणार ?

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State vidhansabha mahavikas aghadi jagavatap ] : राज्यांमध्ये आता लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणूकेची चाहुल सुरु झाली आहे . यांमध्ये जागावाटपावर सर्वांचे लक्ष वेधले आहेत , यांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 100 जागा मिळण्याची शक्यता आहे .

विधानसभा निवडणुकीला 3-4 महिने शिल्लक आहेत , यामुळे जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रचार – प्रसार करता येईल , याकरीता जागावाटपावर अधिक भर दिला जात आहे . या विधानसभेत काँग्रेस पक्षाला 100 ते 105 जागा मिळण्याची शक्यता आहे , तर ठाकरे गटाला 90 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे , त्या खालोखाल शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे .

जागावाटपावर जे वरील पक्षांमधील विद्यमान आमदार आहेत ,अशांना प्रथम स्थान दिले जाणार आहेत , तर नव्याने तिकीटे देवून त्या मतदार संघांमध्ये प्रचार – प्रसार केला जाणार आहे . लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला चांगलेच यश मिळाल्याने , काँग्रेस पक्षानंतर ठाकरे गटाला जागावाटपांमध्ये सर्वाधिक जागा दिले जाणार आहेत .

तर लोकसभा निकालानुसार जागा वाटप फॉर्म्युला ठरवला जाणार असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत . विधासभा निवडणुकींमध्ये देखिल ठाकरे गटाला चांगलेच यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहेत .तर काँग्रेस पक्षाला मागील विधानसभेपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

ठाकरे गटाला विधानसभेत मुंबई मध्ये सर्वाधिक जागा दिले जाणार आहेत . तर विदर्भ , उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागांमध्ये काँग्रेसला तर शरद पवार यांच्या पक्षाला पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रांमध्ये सर्वाधिक जागा मागणी करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यावेळी देखिल महाविकास पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्या हाती असणार आहे .

Leave a Comment