Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state vidhansabha election sanbhavya dates ] : राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतदान व आचार संहिताच्या संभाव्य तारखा समोर येत आहेत . केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पथकाकडून कालपासुन राज्याचा आढावा घेतला जात आहे , सदर आढावा आजपर्यंत असणार आहे .

सदर केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पथकांमध्ये एकुण 14 अधिकाऱ्यांचा समावेश आहे , सदरचे पथक गुरुवारी राज्यात दाखल झाले आहेत , सदर पथकाचे नेतृत्व राजीव कुमार हे करीत आहेत . सदर पथकाकडून शनिवार ( आज दि.28.09.2024 ) पर्यंत आढावा घेण्यात येणार आहेत . प्राप्त माहितीनुसार राज्याच्या विधानसभा निवडणुका ह्या दि.15 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत , तर दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत निकाल जाहीर केला जाणार आहे .

केंद्रीय निवडणुक आयोगाचा दौरा : केंद्रीय निवडणुक आयोग पथक यांची काल दिनांक 27.09.2024 रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केली , त्यानंतर राज्यातील मुख्य निवडणुक अधिकारी , जिल्हा निवडणुक अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांची बैठक 2 वाजता घेण्यात आली . तर संध्याकाळच्या वेळी , राज्याचे मुख्य सचिव , राज्याचे पोलिस महानिरीक्षक तसेच प्रशासकीय विभागाचे सचिव व रविष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे .

आचार संहिता कधी लागु होणार ? : सदर पथकाकडून राज्याचा दौरा करुन पुढील शनिवारी निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद संपन्न होणार आहे , त्यानंतर लगेचच आचार संहिता लागु होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

तर प्रत्यक्ष निवडणुकांच्या संभाव्य तारखा 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान होणार असल्याचा अंदाज  आहेत , तर दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *