Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update upto next 48 hours ] : राज्यांमध्ये कालपासुन प्रलंयकारी पावसाला सुरुवात झालेली आहे , विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे . बऱ्याच ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे . तर काही ठिकाणी पाण्यांचे नद्यांचे स्वरुप धारण केले आहेत .
काल दिनांक 20 जुलै रोजी राज्यातील नागपुर , अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे , यामुळे या जिल्ह्यात अतिवृष्टीचे स्थिती निर्माण झालेली आहे , या भागांमध्ये अतिवृष्टी मुळे काल नागपुर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती .
तर अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुक्यातील नद्यांना पुर आले आहेत , तर माधा गावांमध्ये घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे . यामुळे या ठिकाणी पावसामुळे स्थिती अधिकच गंभीर झालेली आहे . तर पुढील 24 तासांमध्ये राज्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामन खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे .
हवामान खात्यांने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मध्य महाराष्ट्र , कोकण , विदर्भ या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . हवामान खात्यांने पुढील 24 तासापर्यंत 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .
यांमध्ये सातारा , रायगड , चंद्रपुर , नागपुर , वर्धा पाच या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . तर गडचिरोली , यवतमाळ , अमरावती , भंडारा , गोंदिया , नांदेड , ठाणे , पुणे , कोल्हापुर , पालघर , रायगड , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .
पुढील दोन दिवस या 8 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी : राज्यातील विदर्भातील अकोला , अमरावती , नागपुर , वर्धा , यवतमाळ तसेच सातारा , रायगड व रत्नागिरी या आठ जिल्ह्यांत पुढील दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !