Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state rain Update upto 30 October ] : राज्यात दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे .  या संदर्भात हा हवामान तज्ञ के एस. होसाळीकर तसेच हवामान खात्याकडून पावसाचा नवीन अंदाज व्यक्त केला आहे .

सदरच्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 03 दिवस पावसाची उघडझाप दिसून येणार आहे . राज्यामध्ये मागील दोन आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतमालाचे नुकसान झालेले आहे . असाच आणखीन 03 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

दिनांक 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान चा पाऊसमान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊया ..

29 ऑक्टोबर रोजीचा अंदाज : दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये सातारा , रत्नागिरी , रायगड , पुणे ,अहमदनगर,  छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग , नांदेड , हिंगोली , जालना , परभणी , चंद्रपूर , यवतमाळ , गोंदिया , गडचिरोली , भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सदर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

30 ऑक्टोबर रोजीचा अंदाज : दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राज्यात बीड ,  जालना ,  छत्रपती संभाजीनगर , सातारा , पुणे , रायगड , रत्नागिरी , कोल्हापूर , सांगली , सोलापूर , सिंधुदुर्ग , धाराशिव त्याचबरोबर नागपूर , वर्धा , यवतमाळ , गडचिरोली , चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

31 ऑक्टोबर रोजीचा अंदाज : 31 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये वर्धा , चंद्रपूर , यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *