Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update ] : राज्यांमध्ये दिनांक 7 मे पासुन अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यांसह गारपिटीची अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे , यामुळे राज्यात काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .आता आजपासून पुढील 2 दिवसांमध्ये काही भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक 19 मे पर्यंत पावसाची शक्यता असणार आहे , या काळांमध्ये मराठवाडा विभागात पावसाची मोठी शक्यता असणार आहे . आजपासून ते दिनांक 19 मे पर्यंत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यांकडून देण्यात आलेली आहे .
आज दिनांक 17 मे रोजी जालना , छत्रपती संभाजीनगर हे दोन जिल्हे वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर दिनांक 18 मे रोजी मराठवाड्यातील हिंगोली , नांदेड , लातुर , बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे , तर 19 मे रोजी पावसाची प्रमाणे काहीसे कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्यांकडून देण्यात आलेली आहे .
तर या कालावधीमध्ये धाराशिव , नांदेड व लातुर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजेची मेघगर्जना होणार असल्याने या भागांमध्ये विजा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे शेतकरी / नागरिंकानी सर्तकता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तर दिनांक 19 मे 2024 नंतर राज्यांमध्ये पावसाची तिव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे , तर दुसरी कडे देशांमध्ये अंदमान भागात दिनांक 19 मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज तर दिनांक 31 मे पर्यंत केरळमध्ये मान्सुनचे आगमन होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .