Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा कहर पुढील आठवड्यापर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यांकडून देण्यात आलेली आहे . मागिल 4 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत .
मागिल काही दिवसांपासुन राज्यांमध्ये मुंबईसह कोकण , मराठवाडा , विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे . मुंबई शहर व उपनगर मध्ये वादळी वाऱ्यांच्या पावसांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत . यांमुळे अनेक नागरिक जखमी देखिल झाले असल्याची माहिती समोर आली आहे . त्याचबरोबर मराठवाडा व विदर्भांमध्ये अवकाळी पावसांने मागील आडवड्यांपासून मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहेत .
भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढील 72 तासांमध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरुच राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .हवामान अंदाजानुसार कर्नाटक भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने , मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांचा पट्टा सक्रिय होत आहे , यामुळे वादळी पाऊस पडत आहेत .
राज्यातील या 26 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी शक्यता : पुढील 72 तासांमध्ये राज्यातील धाराशिव , लातुर , बीड , जालना , छत्रपती संभाजी नगर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक , नगर , पुणे , सातारा , सांगली , सोलापुर ,कोल्हापुर , त्याचबरोबर विदर्भा विभागामधील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .
तर दुसरीकडे कोकण विभागातील पालघर , मुंबई , ठाणे या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे राज्यातील शेतकरी व नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .