Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Rain Update News ] : राज्यांमध्ये काल दिनांक 02 जुन 2024 पासुन जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे . तर सदरचा पाऊस दिनांक 10 जुन पर्यंत राज्यांमध्ये सर्व जिल्ह्यात प्रवास करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यासाठी पुढील 02 दिवस हायअलर्ट जारी करण्यात आलेले आहेत , कारण काही ठिकाणी जोरदार पावसांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे , तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . काल दिनांक 02 जुन रोजी कोकण , पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लातुर , धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे .

तर आज दिनांक 03 जुन पासुन उर्वरित मराठवाडा , व पुढे दिनांक 05 जुन पासून विदर्भामध्ये यवतमाळ मार्गे पावसाची दमदार एन्ट्री होणारअसलयाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 07 ते 10 जुन दरम्यान जोरदार मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे .

दोन दिवस हायअलर्ट जारी : सदरचा पाऊस हा अवकाळी स्वरुपाचा असल्याने , या दरम्यान वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रति ताशी असणार आहे . यामुळे स्थावर व जंगम संपत्तीची नुकसान होण्याची शक्यता आहे . राज्यातील बुलढाणा , सांगली , सातारा , सोलापुर , नांदेड , धाराशिव , अकोला , अमरावती , भंडारा , लातुर या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आल्याने , सदर जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *