Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update News ] : महाराष्ट्र राज्यातील खाली नमुद 5 जिल्ह्यांमध्ये दिनांक 11 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये , वादळी / वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यांने दिला आहे .  

राज्यात पुढील पुढील पाच दिवसांमध्ये काही भागांमध्ये उन्हाचे प्रमाण अधिकच वाढणार असून , तर पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावस मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचे हवामान खात्याने नमुद केले आहेत . यांमध्ये विदर्भ , मध्य महाराष्ट्र , मराठवाडा व खानदेश मधील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून , नागपूर , गोंदिया , भंडारा , अकोला , अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये विजेच्या गर्जनासह गारपीट होण्याची मोठी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे .

याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , परभणी , हिंगोली , जालना , लातुर , नांदेड , धाराशिव तर मध्य महाराष्ट्रात सांगली , सातारा जिल्ह्यात तर विदर्भांमध्ये बुलढाणा , गडचिरोली , यवतमाळ , वाशिम , चंद्रपुर , गडचिरोली बीड , हिंगोली  या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे .

त्याचबरोबर उद्या पर्यंत वाशिम , बुलडाणा , नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मेघ गर्जनासह गारपीट आणि पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे .

तर गरुवारी राज्यातील मराठवाडा , खानदेश , विदर्भ , व मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर शुक्रवारी आणि शनिवारच्या दिवशी विदर्भ , खानदेश , मध्य महाराष्ट्र व मराठवाडातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

तर पुढील पाच दिवस विदर्भातील गोंदिया , नागपूर , भंडारा , अकोला , अमरावती या पाच जिल्ह्यांना गारपीटांस अवकाळी पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *