Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update News ] : राज्यांमध्ये पुढील 4 दिवस विदर्भांमध्ये पावसाचा मुक्काम राहील , तर राज्यातील या 16 जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे याबाबतचा सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात ..
विदर्भांमध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता : आजपासून पुढील 4 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . तर या कालावधीमध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावर रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर विदर्भांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
राज्यातील या 16 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट : राज्यात आजपासून पुढील 4 दिवस 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे , यांमध्ये पुणे , गडचिरोली , गोंदिया , भंडारा , नागपुर , चंद्रपुर , वर्धा , यवतमाळ , वाशिम , अकोला , अहमदनगर , बुलढाणा , अमरावती तर मराठवाड्यातील धाराशिव , लातुर , बीड या 16 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
कोकणांमध्ये उकाडा वाढला : कोकणांमध्ये जोराचा पाऊस झाल्यानंतर आता मुंबई , ठाणे , पालघर जिल्ह्यातील तापमानांमध्ये वाढ झाली आहे . तापमानाचा पारा गेल्या 24 तासांमध्ये 2.3 अशं सेल्सिअसने वाढला आहे . यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .