Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update new andaj ] : राज्यांमध्ये दिनांक 19 जुलै पर्यंत धो-धो मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे , याबाबत हवामान खात्यांकडून नविन हवामन अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात ..
यंदाच्या वर्षी माहे जुन महिन्यांत चांगला पाऊस झाला नाही , यानंतर जुलै महिन्यांचा पहिला आठवडा देखिल कोरडाच गेला . यामुळे राज्यात शेतीसाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा अजुनही कायम आहे . परंतु आता राज्यांमध्ये पुन्हा एकदा मोठा पावसाला सुरुवात होणार आहे .
राज्यांमध्ये आजपासुन ते दिनांक 19 जुलै पर्यंत राज्यांमध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे . हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 14 जुलै रोजी कोकण , विदर्भ विभागांमध्ये जोरदार पाऊस पडेल तर खानेदशांमध्ये मध्यम तर मराठवाड्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
तर आजपासुन राज्यांमध्ये पावस अधिकच जोर धरेल असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे . कोण- कोणत्या जिल्ह्यात कधी जोरदार पाऊस पडेल याबाबतचा अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात ..
हवामान खात्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये दिनांक 14 जुलै आज रोजी राज्यातील कोकण विभागातील सर्व जिल्हे , तसेच पुणे , कोल्हापुर , सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे . त्यानंतर पाऊस हा हळूहळू पुर्वेकडील जिल्ह्यांमध्ये सरकणार असल्याचा अंदाज आहे , यांमध्ये 15 जुलै रोजी मराठवाड्यातील छ.संभाजीनगर , परभणी , जालना , लातुर , धाराशिव , हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
तर दिनांक 16 ते 18 जुलै पर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर दिनांक 19 जुलै रोजी राज्यातील सर्वत्र भागांमध्ये मध्यम / किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !