Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Havaman Andaj ] : भारतीय हवामान खात्यांकंडून मिळालेल्या अंदाजानुसार ,राज्यातील काही जिल्ह्यांना दिनांक 28 मे 2024 पर्यंत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , सदर जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .
राज्यात मागील आठवड्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शिथिलता घेतली होती , परंतु आता पुन्हा अवकाळी पावसाने जोर अधिक धरला आहे , काल दिनांक 22 मे रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडाक्यासह जोरदार हजेरी लावली . मराठवाड्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण 43 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे , यामुळे अवकाळी पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे .
दि.28 मे पर्यंत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता : राज्यातील अहमदनगर , कोल्हापुर , सातारा , रत्नागिरी , नाशिक , जळगाव , सिंधुदुर्ग , रायगड , रत्नागिरी , छत्रपती संभाजीनगर , लातुर , धाराशिव , बीड , नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर अधिक असणार आहे .
या शिवाय विदर्भातील बुलढाणा , अकोला , वाशिम , अमरावती , यवतमाळ , चंद्रपुर , भंडारा , गोंदिया या भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर दिनांक 28 मे पर्यंत असणार आहे . सदर अवकाळी पाऊस विजेच्या कडाक्यासह जोराने पडत असल्याने , शेतकरी / नागरिकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
राज्यात मान्सूनचे आगमन कधी होणार ? : देशात केरळ राज्यांमध्ये दिनांक 28 मे ते दिनांक 3 जुन 2024 दरम्यानच्या कालावधीमध्ये मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यंमध्ये 28 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम असणार आहे , तर राज्यांमध्ये मान्सुनचे आगमन हे दिनांक 7 ते 8 जुन दरम्यान येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
प्रथम राज्यात कोकणांमध्ये मान्सूनचे आगमन होईल , त्यानंतर दिनांक 15 जून पर्यंत राज्यातील संपुर्ण जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल , असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे .