Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state rain Update 06 to 09 October ] : राज्यामध्ये दि. 23 सप्टेंबर पासून मान्सून परतीच्या प्रवासात असून , राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस झाला आहे . तर राज्यामध्ये दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा अति – जोरदार पावसाचा इशारा  हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे .

सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असून , मागील पाच-सहा दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पीक काढणीवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे . तर राज्यात पुन्हा एकदा 6 ऑक्टोबर पासून पाऊस धुमाकूळ घालणार असल्याने , शेतीमधील उर्वरित कामे करून घ्यावेत असे निर्देश हवामान तज्ञ पंजाबराव डग यांनी दिली आहे .

6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत अचानक पावसाची शक्यता : दिनांक 06 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा अति जोरदार पावसाची शक्यता असणार आहे , सदरचा पाऊस राज्यामध्ये सर्व दूर असणारा असून , काही ठिकाणी कमी वेळ पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे .

या जिल्ह्यांना किरकोळ पावसाची शक्यता : दिनांक 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पुणे , सातारा,  सांगली , नगर , नाशिक , सोलापूर , कोल्हापूर तसेच संपूर्ण मराठवाडा , खान्देश अशा 18 जिल्ह्यांमध्ये केवळ ढगाळ वातावरण राहणार असून , पावसाची कमी शक्यता असणार आहे . तर काही तुरळक ठिकाणीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्याचबरोबर कोकण , मुंबई , विदर्भ मधील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती दिनांक 01 ते 05 ऑक्टोबर दरम्यान उघडझाप स्वरूपाची असणार आहे .

परंतु 06 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , त्यानंतर राज्यामध्ये दिनांक 13 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहील , त्यानंतर दिनांक 16 ऑक्टोबर नंतर मान्सून निरोप घेण्याच्या तयारीत राहील , असा अंदाज हवामान तज्ञांकडून  देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *