Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Public Leave Dated 22 January 2024 ] : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या , उत्तर प्रदेश येथे श्रीरामाच्या मंदीरामध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे . याकरीता देशभरातुन अनेक भावी , भक्त येणार आहेत . याकरीता यापुर्वीच उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिनांक 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर केली आहे .
त्याचबरोबर गोवा राज्य सरकारने देखिल श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमासाठी गोवा राज्यात एक दिवसांची सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . देशभरातुन अनेक भावी – भक्त उपस्थित राहणार असल्याने , देशातील इतर राज्य सरकारकडून देखिल या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येईल .
महाराष्ट्र राज्यात देखिल जाहीर होणार सरकारी सुट्टी : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी मागणी केली होती . त्यावेळी अध्यक्षांनी याबाबत राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देखिल देण्यात आलेले होते . आता भारतीय जनता पार्टीचे बडे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी राज्यात सरकारी सुट्टी जाहीर करावी ..
अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ( देवेंद्र फडणवीस , अजित पवार ) यांना यांना सादर करण्यात आलेले आहेत . कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीरामाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त देशांमध्ये दिवाळी साजरा करावी असे सांगण्यात आले आहेत . यामुळे राज्यातुन देखिल अनेकजन अयोध्यासाठी रवाना होणार आहेत . यामुळे
सरकारी सुट्टीस सरकार सकारात्मक : अधिवेशांमध्ये दिनांक 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी सदस्यांनी केली असता , यावर अध्यक्षांनी सांगितले होते कि , यावर संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करावी . यामुळे राज्य सरकार 22 जानेवारीला सरकारी सुट्टी देण्यास सकारात्मक आहे , परंतु याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावेत , जेणेकरुन राज्यातील लोकांना अयोध्याला रवाना होण्यासाठी नियोजन करता येतील , अशी विनंती करण्यात येत आहे .