Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Padma Award News ] : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत , पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो . यांमध्ये राज्यातील 12 दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्या उत्तम कार्यासाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत .
पद्मभुषण पुरस्कार विजेते : होर्मुसजी कामा ( साहित्य व शिक्षण – पत्रकारिता ) : प्रसिद्ध साहित्यिक होर्मुसजी कामा यांना साहित्य व शिक्षण – पत्रकारिता , अश्विन मेहता यांना वैधक , ज्येष्ठ नेते राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रांमध्ये , तर दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रांमध्ये तर कुदंन व्यास यांना साहित्य शिक्षण , पत्रकारिता करीता अशा 06 जणांना पद्मभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे .
पद्मश्री पुरस्कार विजेते : विविध क्षेत्रांमध्ये अमुल्य योगदान देणाऱ्या 06 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे . यांमध्ये बालगृहाच्या माध्यमातुन दिव्यांग आणि अनाथ मुलांचे अधारवड असणारे समाकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव यांना सामाजिक कार्यासाठी , तर किडा क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उद्य देशपांडे यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे .
तर वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झकीर काझी यांना तर वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदु रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे . तर बँकर कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेलेा आहे .
देशातील एकुण 132 जगांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत . यांमध्ये एकुण 05 पद्मविभूषण तर 17 पद्मभूषण तर 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे .