लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याची वाढती लोकसंख्या व जिल्हा प्रशासनांवर येणारे वाढते कामकाज यामुळे नागरिकापर्यंत अनेक सोयी , सुविधा पोहचू शकत नसल्याने राज्यांमध्ये जिल्हांचे विभाजन होणे गरजेचे आहे . यासाठी राज्यातील तब्बल 22 नविन जिल्ह्यांची मागणी होत आहे . सदर जिल्ह्यांचे भौगोलिक दृष्ट्या मोठे आकार तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणांपेक्षा इतर ठिकाणांचे महत्व अधिक असणे या कारणांने जिल्हा विभाजन होणे आवश्यक वाटत आहेत .
जिल्हा विभाजनाला राज्य शासनांकडून देखिल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला असून , जिल्हा विभाजन बाबत प्रस्तावाची तयारी देखिल करण्यात आलेली आहे . प्रस्ताव तयार करताना नविन जिल्ह्यांची आवश्यकता तसेच जिल्हा मुख्यालयांपासून अंतर , इतर सोयी , सुविधा या बाबींचा विचार करुनच जिल्हा विभाजनावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे .
राज्यातील नाशिक , नांदेड , यवतमान , औरंगाबाद , अहमदनगर , रायगड हे जिल्हे आकाराने सर्वात मोठे जिल्हे आहेत , यामुळे भौगोलिक दृष्ट्या अनेक तालुक्यातील लोकांना जिल्हा मुख्यालयांपासून अधिक अंतराचा प्रवास करावा लागतो . यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करता तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावा , तसेच जिल्हा प्रशासनांवरील कामकाजाचा ताण कमी व्हावा यासाठी जिल्हा विभाजनांची आवश्यक असल्याचे नमुद करण्यात येत आहेत .
राज्य शासनांकडून खालील जिल्ह्यांचे विभाजन करुन नविन 22 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे ..
1.नाशिक जिल्ह्यांचे विभाजन करुन मालेगाव व कळवण जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे .
2.पालघर जिल्ह्याचे विभाजन करुन जव्हार जिल्ह्याची निर्मिती करण्योच प्रस्तावित आहे .
3.ठाणे जिल्ह्यांचे विभाजन करुन मीरा भाईंदर व कल्याण जिल्ह्यांचे निर्मिती करण्यात येणार आहे .
4.अहमदनगर जिल्हाचे विभाजन करुन शिर्डी , संगमनेर व श्रीरामपुर जिल्हांचे विभाजन करण्यात येणार आहेत .
5. पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
6.रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन महाड जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
7.सातारा जिल्ह्याचे विभाजन करुन माणदेश जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
8.रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करुन मानगड जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
9.बीड जिल्ह्याचे विभाजन करुन अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
10.लातुर जिल्ह्याचे विभाजन करुन उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
11.नांदेड जिल्ह्याचे विभाजन करुन किनवड जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
12.जळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन भुसावळ जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
13.बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करुन खामगाव जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
14. अमरावती जिल्ह्याचे विभाजन करुन अचलपुर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
15.यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करुन पुसद जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
16.भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन साकोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
17.चंद्रपुर जिल्ह्याचे विभाजन करुन चिमुर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .
18.गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करुन अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे .