Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Jilha & Taluka Vibjajan News ] : महाराष्ट्र राज्यात वाढत्या लोकसंख्या व प्रशासनांच्या सोयीकरता नविन 22 जिल्हे तर 49 नविन तालुक्यांची निर्मिती करण्याची बाब प्रस्तावित होती . यांमध्ये ज्या जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार आकार मोठा आहे किंवा ज्यांना प्रशासकीय अडचणी निर्माण येत आहेत . अशा जिल्ह्यांतुन नविन जिल्हांच्या व तालुक्यांची निर्मिती करण्यात येणार आहेत .

नविन जिल्‍हे व तालुक्यांची निर्मिती करणेबाबत राज्य शासनांकडून सन 2018 मध्ये सविस्तर अभ्यास अहवाल तयार करण्यात आला होता . यानुसार राज्यात नविन 22 जिल्हे व 49 नविन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता . सदर प्रस्तावास अद्याप पर्यंत मान्यता न मिळाल्याने प्रस्ताव आणखीण प्रतिक्षेत आहे .

अ.क्रविद्यमान जिल्हाप्रस्तावित जिल्हे
01.ठाणेमीरा भाईंदर , कल्याण
02.रायगडमहाड
03.पालघरजव्हार
04.नाशिकमालेगाव , कळवण
05.रत्नागिरीमानगड
06.अहमद नगरशिडी , संगमनेर , श्रीरामपुर
07.बीडअंबेजोगाई
08.नांदेडकिनवट
09.सातारामाणदेश
10.बुलडाणाखामगाव
11.पुणेशिवनेरी
12.यवतमाळपुसद
13.अमरावतीअचलपुर
14.चंद्रपुरचिमुर
15.भंडारासाकोली
16.गडचिरोलीअहेरी
17.जळगावभुसावळ
18.लातुरउदगीर

राज्यातील लोकसंख्या वाढीनुसार व नागरिकांच्या सोयीसाठी नवीन जिल्हे व तालुक्यांची निर्मिती होणे गरजेचे आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *