OBC प्रवर्गात राज्यातील “या” जातींचा नव्याने समावेश ; मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला करण्यात आली शिफारस !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state new cast add in obc category ] : इतर मागास प्रवर्गमध्ये राज्यातील काही जातींचा नव्याने समावेश करणे संदर्भात , राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे . यामध्ये नेमक्या कोण-कोणत्या जातींचा समावेश असणार आहे , याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .

महाराष्ट्र राज्यातील 1) लोध , लोढा,  लोधी 2) कापेवार,  मुन्नार कापेवार , मुन्नार कापू , तेलंगा , तेलंगी पेंटारेड्डी , बुकेकरी 3) बडगुजर 4) सूर्यवंशी , गुजर 5) लेवे , गुजर रेवे , गुजर रेवा ,गुजर 6) डांगरी 7) भोयर,  पवार या जातींचा समावेश महाराष्ट्र राज्य इतर मागास प्रवर्ग यादीमध्ये समावेश करणे संदर्भात , केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे .

राष्ट्रीय मागास प्रवर्गाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहिर त्याचबरोबर आयोगाचे सदस्य श्री.भुवन भूषण कमल यांच्या आयोगाने दोन सदस्य खंडपीठाने दिनांक 17 ऑक्टोबर 2023 व दिनांक 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे या संदर्भात सुनावणी घेण्यात आली होती.

यानंतर केंद्रीय मागास प्रवर्ग आयोगाकडून दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी सदर वरील नमूद करण्यात आलेल्या जातींचा महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास प्रवर्ग ( OBC ) मध्ये समावेश करण्याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून , सदर शिफारस प्रस्ताव केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालय विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे .

यामुळे आता वरील नमूद यादीतील जातींचा समावेश राज्याच्या इतर मागास प्रवर्ग (OBC ) मध्ये समावेश केला जाणार आहे , यामुळे सदर यादीतील जातींना OBC प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय होतील .

Leave a Comment