राज्यात नाशिक , सोलापुर , छ.संभाजीनगर येथे कांदा महाबँक स्थापना ; असे असणार बँकेचे कार्य !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state kanda mahabank ] : राज्यांत सोलापुर , नाशिक , छ.संभाजीनगर येथे कांदा महाबँक प्रकल्प तातडीने सुरु करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत . यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत , नेमके या प्रकल्पाचे कामकाज कसे असेल याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

कांदा हा एक प्रकारचा नाशवंत पिक असल्याने , अणु उर्जेच्या माध्यमातुन त्यावर विकिकरण ही प्रिक्रिया करुन साठवणूक करता येते , सदर महाबँक प्रकल्पाच्या माध्यमातुन कांदा साठवणुक करण्यात येणार आहे . ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे . सदरची संकल्पना ही नगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून येत आहेत . त्या ठिकाणी हिंदुस्थान ॲग्रो संस्था ही कांद्याची बँक सुरु आहे . या संकल्पनेतुन नाशिक , सोलापुर , छ.संभाजीनगर येथे कांदा महाबँक प्रकल्प स्थापन करण्यात येत आहेत .

नाशिक , सोलापुर , छ.संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते . यामुळे सदर जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक प्रकल्प तातडीने उभा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत . याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पणन , पणन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या जागांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा ; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

तसेच समृद्धी महा मार्गावर 10 ठिकाणी कांद्याची बँक उभा करण्याचे प्रस्तावित असून , सदर कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत . सदर कांदा महाबँकेमुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करता येणार आहे . तर कांद्याला चांगा भाव मिळाल्यानंतर शंतकऱ्यांना विक्री करता येणार आहे .

सदर महाबँक प्रकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदु ठेवून राबविण्यात आला आहे . सदर महाबँक प्रकल्प ही शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनातुन अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment