राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे , एकुण 20 विधेयके ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state hivali adhiveshan vidheyak ] : महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन काल दिनांक 16 डिसेंबर 2024 पासुन सुरु झालेले आहेत , सदर अधिवेशनांमध्ये एकुण 20 विधेयक मांडण्यात येणार आहेत .

01.महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती तसेच औद्यागिक नागरी सुधारणा विधेयक 2024 यांमध्ये अप्रत्यक्षपणे निवडुन आलेल्या अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कालावधी हा पाच वर्षे इतके करण्याचा प्रस्ताव नमुद आहे .

02.कर्मचाऱ्यांच्या बदल्याचं विनियमन व कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 चे महा.अध्या क्र.06 चे रुपांतरीत विधेयकास माहे ऑगस्टपर्यंत वाढविण्याची तरतुद नमुद आहे .

03.महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 यांमध्ये दंडाची कमाल मर्यादामध्ये वाढ करण्याचे विधेयक 04.सन 2024 चे हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याचे विधेयक . 05. महाराष्ट्र व सेवा कर अध्यादेश हे केंद्रीय अधिनियमांच्या अनुषंगाने सुसंगत सुधारणा करण्याचे विधेयक .

06.महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेषांचे नुकसान करणाऱ्यांस कडक शिक्षा व दंडाची तरतुद .

07.जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्षांच्या निवडणुका पुढे ढकलणे विधेयक .

08.मुद्रांक विधेक

09. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये सुधारणा विधेयक

10.धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध विधेयक

11.श्री.सिद्धीविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था

12.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक

13.महाराष्ट्र विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक

14.महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ , दुसरी विधारणा विधेयक .

इतर प्रस्तावित विधेयके :  15. खाजगी विद्यापीठ दुसरी सुधारण विधेयक ( उच्च व तंत्र विभाग )

16.कारागृह व सुधारसेवा विधेयक

17.जमिन महसुल संहिता विधेयक

18.हैद्राबार अतियात चौकशी सुधारणा विधेयक

19.विधेयक महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा सुधारणा

20.महाराष्ट्र विनियोजन विधेयक ( वित्त विभाग )

Leave a Comment