Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Havaman Andaj Upto 21 Jun ] : राज्यांमध्ये उद्या दिनांक 08 जुन पासुन मान्सून दाखल होणार आहे , कोकणांपासून मान्सुन राज्यात पर्वेकडे पुढे सरकणार आहे . महाराष्ट्र राज्यात आजपासून दिनांक 21 जुन पर्यंत हवामान अंदाज तारीखनिहाय कसा असेल , ते पुढीलप्रमाणे सविस्तरपणे जाणून घेवूयात ..
आज रोजी राज्यातील मराठवाडा , विदर्भ विभागांमध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . तर उद्या दिनांक 08 जुन रोजी कोकण विभागामध्ये मान्सुनचा पहिला पाऊस पडणार आहे . तर दिनांक 08 जुन रोजी मराठवाडा , विदर्भांमध्ये मुसळधार पाऊस दिनांक 11 जुन पर्यंत कायम असणार आहे .
यानंतर मराठवाडा , विदर्भांमध्ये दिनांक 12 जून ढगाळ वातावरण राहील व त्यानंतर मान्सुनच्या सऱ्याला सुरुवात होईल , सदरचा मान्सुन हा दिनांक 21 जुन पर्यंत संपुर्ण राज्यात सक्रिय होईल . यावेळी राज्याचे किमान तापमान हे 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस दरम्यान असेल .
कोकणांमध्ये दिनांक 11 जुन पर्यंत मान्सुन अधिक सक्रिय होईल , त्यानंतर मान्सुन पश्चिम महाराष्ट्रात 15 जुन पर्यंत तर मराठवाडा व विदर्भांमध्ये मान्सुन खऱ्या अर्थ्याने 17 जुन पासुन जोरदार सुरुवात होईल .तर संपुर्ण राज्यांमध्ये दिनांक 21 जुन पर्यंत मान्सुन अधिक सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आली आहे .
मराठवाडा व विदर्भातील सर्वसाधारण हवामान अंदाज पुढीलप्रमाणे असेल .
दिनांक | हवामान अंदाज |
07 ते 11 जुन | मेघगर्जनेसह पाऊस |
12 जुन | ढगाळ |
13 जुन | पावसाच्या सरी |
14 ते 16 जुन | ढगाळ वातावरण |
17 ते 21 जुन | पावसाच्या सरी |