Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state havaman andaj see detail ] : राज्यामध्ये दिनांक 08 ते 21 नोव्हेंबर दरम्यान हवामान कसा राहील ? याबाबत हवामान खात्याकडून नवीन अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . या संदर्भातील सविस्तर अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई मार्फत दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस तापमानामध्ये घट दिसून येणार आहे . त्यानंतरच्या काळात अचानक तापमानामध्ये वाढ होणार आहे , तर पुढील 04 दिवसांमध्ये मराठवाड्यातील हवामान कोरडे राहणार आहे .

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , मराठवाड्यातील जालना , धाराशिव , छत्रपती संभाजीनगर , परभणी , नांदेड , बीड , हिंगोली , लातूर या जिल्ह्यामध्ये दिनांक 08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे . सदरच्या काळामध्ये पाऊसमान कमी तर तापमानामध्ये सरासरीपेक्षा वाढ होणार आहे .

तर दिनांक 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊसमान हळूहळू कमी होत जाईल , तर तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . म्हणजेच एकंदरीत पाऊसमान हळूहळू कमी होत जाईल .

शेतकऱ्यांना सल्ला : राज्यात मराठवाडा , विदर्भामध्ये तापमान अधिक असतो . यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये असणारी ओल लक्षात घेऊन तात्काळ पेरणी करून घ्यावी , कारण जमिनीतील ओल हळूहळू कमी होत जाईल . यामुळे पेरणी करून घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *