Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state govt./ semi govt. employee local holidays paripatrak ] : राज्य शासन सेवेतील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून 02 दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे , या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.18 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , राज्य शासनांच्या सा.प्र.विभाग क्र.सार्वसु-1196/ प्र.क्र.5/96/29 , दिनांक 18 सप्टेंबर 1996 नुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी त्याचबरोबर सन 2007 पासुन गोपाळकाला ( दहीहंडी ) या सणाच्या निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांकरीता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते .
त्यानुसार सन 2025 मध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांकरीता सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सदरच्या शासन परिपत्रकानुसार स्थानिक सुट्टी ( Local Holiday ) जाहीर करण्यात आला आहे .
सदरचा शासन परिपत्रक हा राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना लागु राहणार आहेत . या संदर्भातील सविस्तर सुट्टीचा शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.