जूनपासून शाळांचे वेळापत्रकांमध्ये मोठा बदल , सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरणार शाळा ! सरकारने घेतला मोठा निर्णय !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करणेबाबत राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे . शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून आता राज्यातील शाळा सकाळी 7 पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरणार आहेत , यामुळे शिक्षकांना अधिकची कसरत करावी लागणार आहे .या संदर्भात राज्य शासनांकडून घेण्यात आलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

दोन सत्रांमध्ये भरणार शाळा – महाराष्ट्र राज्यातील आश्रमशाळा बाबतीत हा निर्णय आदिवासी विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे . राज्यातील आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागांकडून तब्बल 499 शासकीय आश्रमशाळा तर 556 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात . सदर शाळांमधील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपये रुपये खर्च करण्यात येते .

आश्रमशाळांमध्ये शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे परंतु शिक्षक – कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत अशी बाब विचारात घेवून आश्रमशाळा दोन सत्रांमध्ये सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी घेतला आहे .पहीले सत्र हे  सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत भरणार आहे तर दुसरे सत्र हे दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत भरणार आहेत .

हे पण वाचा : जुनी पेन्शन , मोफत वीज व 500/- रुपयात गॅस देण्याची घोषणा !

सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीपासूनच हे वेळापत्रक लागु करण्यात येणार असल्याची माहीती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे .त्याचबरोबर विद्याथी व शिक्षकांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी होणार असून यांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा चेहरा डिटेक्शन होणार असल्याने विद्यार्थी – शिक्षकांना दररोज शाळेत हजर हरावे लागणार आहे . अशी माहीती आदिवासी विकास विभागांकडून देण्यात आलेली आहे .

सरकारी कर्मचारी विषयक अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हावे !

Leave a Comment