Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state farmer electricity bill savalt gr ] : राज्यांमधील कृषीपंप धारक ग्राहकांना वीज दरांमध्ये सवलत देणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 18 जुन 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यांमधील विविध संवर्गातील ग्राहकांना शासनांच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरांमध्ये सवलत देण्यात येते , व त्याची प्रतिपुर्ती शासनांकडून वितरण कंपनीस करण्यात येते , वितरण कंपन्यांना कृषीपंप ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन 2024-25 करीता लेखाशिर्ष 28015572 खली रुपये 5685/- कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतुद करण्यात आलेली आहे .

सदर तरतुदीपैकी वित्त विभागाच्या दिनांक 01.04.2024 रोजीच्या निर्णयानुसार व त्यामधील सुचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्याच्या नंतर रक्कम रुपये 1706.22 कोटी इतका निधी महावितरणाला समायोजनाने वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदर शासन निर्णयानुसार कृषीपंप ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन 2024-25 करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रुपये 5685/- कोटी रक्कमेपैकी रुपये 1706.22 कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत यांना समायोजनाने वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहेत .

सदरचा निधी हा वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार , वीज दरात सवलत , कृषीपंप ग्राहकांना वीजदर सवलत , अर्थसहाय्यक या लेखाशिर्षांखाली रक्कम खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *