Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state empoloyee retirement age news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे कि , केंद्र सरकार व इतर 25 राज्य शासनाप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात यावीत .
या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत प्रस्ताव तयार करुन मंत्रीमंडळ मंजुरीसाठी 1 महिनापुर्वीच पाठविण्यात आले आहे , परंतु सदर प्रस्तावावर निर्णय घेण्या अगोदरच अनेकांकडून सदर प्रस्तावास विरोध दर्शविण्यात येत आहेत . यांमध्ये विधानभवनाला काही सदस्यांचा तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची सदर प्रस्तावा विरोधी दर्शविण्यात आला आहे .
निवृत्तीचे वय 60 वर्षे ऐवजी 55 वर्षे करण्याची मागणी : राज्यातील वर्ग अ ते क पर्यंतच्या संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , तर चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे . यांमध्ये संवर्ग अ ते क पर्यंतच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 02 वर्षांने वाढविण्याची मागणी होत आहे . परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे नकोच तर त्याऐवजी 55 वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे .
तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेले आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे इतके केल्यास सरकारी नोकर भरतीला खीळ बसेल व त्याचा फटका राज्यातील बेरोजगारांना बसेल , अशा प्रकारची भुमिका स्पर्धा परीक्षकांकडून मांडण्यात आली आहे . सदर निर्णयास विरोध करणारी स्पर्धा परीक्षांची प्रतिनिधित्व करणारी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती व स्टुडंट्स राईट असोसिएशन या संघटनेमार्फत विरोध दर्शविण्यात आला आहे .
वेतनावरील खर्चात बचत होईल : जर निवृत्तीचे वय हे 60 वर्षे ऐवजी 55 वर्षे केल्यास , शासनांस कमी वेतन द्यावे लागेल . तसेच वेतनावील खर्चात बचत होईल , अशा प्रकारची भुमिका सदर विद्यार्थी संघटनांमार्फत मांडण्यात आली आहे .
निवृत्तीचे वय हे 60 वर्षे केल्यास , पदे हे लवकरच रिक्त होणार नाहीत , ज्यामुळे राज्यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढेल व विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वाढण्यास सुरुवात होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.