कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन बाबत बैठक संपन्न ; जाणून घ्या इतिवृत्त..

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बैठक संपन्न झाली , सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे पाहूयात .

यामध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड  वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन देण्यात यावे , अशी मागणी केली असता , बैठकीमध्ये नमूद करण्यात आले की , महाराष्ट्रातील विविध विभागातील लिपिकांचे काम समान असून त्याप्रमाणे सर्व विभागात समान वेतन करण्यात यावे .  त्या संदर्भात महसूल मंत्रालय आणि लेखा विभागात लिपिकांचे पदनाम बदलून त्यांना जास्त वेतन दिलेले आहे , सर्व विभागांमध्ये वेतनाबाबत असलेली तफावत दूर करून त्याप्रमाणे वेतन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे . त्याचबरोबर  मंत्रालयीन लिपिकाप्रमाणे टंकलेखन भत्ता 5000/-  रुपये , मुंबई शहर व मुंबई परिसरातील सर्व विभागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा . आणि ग्रामीण भागातील लिपिकांना 3 हजार रुपये टंकलेखन भत्ता मंजूर करावा . अशी मागणी यावेळी करण्यात आली , यासंदर्भात तपासून कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले .

सुधारित आश्वासित प्रगती योजना : शिक्षकेतर कर्मचारी यामधील लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निमशासकीय कार्यालय इत्यादी मधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना 10 , 20 , 30 लागू करण्याची मागणी केली असता या संदर्भात तात्काळ आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10:20 : 30 चे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे , अशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहे .

NPS  / DCPS ऐवजी जुनी पेन्शन : सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको असून , जुनी पेन्शन लागू करावी याबाबत मागणी केली , केली असता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागाने यावेळी नमूद केले आहे .

समान पदोन्नीतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी : समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी केली असता , या संदर्भात आढावा घेऊन दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत कारवाई करू अशा प्रकारचे आश्वासन  व्ही . राधा मॅडम यांनी दिली आहे .

सुधारित वेतन : बक्षी समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड पे 1900/-  ऐवजी 2400/-  लागू करण्याची मागणी केली असता , वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना 2400/-  ग्रेड पे मंजूर करण्याची मागणी कॅबिनेट समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावास नामंजुर करण्यात आली असल्याने , याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment