Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees imp gr dated 24 sep. 2024 ] : राज्य शासनाच्या गृह विभागांतर्गत वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील अधिकारी /  कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तर ज्यांचे वय वर्ष 51 व त्यापेक्षा अधिक आहे .  अशा अधिकारी / कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केली आहे . तसेच सदर वैद्यकीय तपासणी करिता पाच हजार रुपये इतकी रक्कम पर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते .

सदर वैद्यकीय तपासणी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये दवाखान्यांची यादी नमूद करण्यात आलेली आहे . सदर दिनांक 24 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करिता मुंबई  / कोकण विभाग करिता रुग्णालयांच्या यादीमध्ये नव्याने तीन रुग्णालयांचा समावेश करण्याची बाब राज्य शासनाच्या विचारात होती .

यानुसार गृह विभाग अंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता मुंबई व कोकण विभाग साठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाच्या प्रपत्र अ मध्ये नमूद केलेल्या रुग्णालयाच्या व्यतिरिक्त आता नव्याने अपोलो क्लिनिक वाशी , अपोलो क्लीनिक अंधेरी ( पूर्व ) व अपोलो क्लिनिक नाशिक या तीन रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे .

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही राज्य शासनाच्या गृह विभाग मार्फत करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहे . या निर्णयामुळे ग्रह विभागातील अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणी करिता सोईस्कर होणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *