राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनत्रुटी निवारण करणेबाबत ,बैठकीचे विभागनिहाय वेळापत्रक , पाहा सविस्तर  !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State employee vetantruiti nivaran timetable ] : राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्य प्रस्तावांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14 जुन 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . ज्यांमध्ये राज्यातील विभागनिहाय वेतनत्रुटी समितीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहता येईल ..

वरील वेळापत्रकानुसार मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्र.241 हुतात्मा राजगुरु चौक , मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई – 400032  येथे आयोजित करण्यात आली आहे . तरी सर्व प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येत आहे कि , सदर बैठकीबाबत त्यांच्या अधिपत्याखालील संबंधित संवर्गांच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संघटनेच्या तसेच …

ग्रामविकास विभागाच्या व शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाच्या न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित प्रतिनिधींना प्रशासकीय विभागाच्या स्तरावर कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तर दिनांक 28 जुन 2024 ते दिनांक 16 जुलै 2024 या दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार असल्याने , सुनावणी होणार नसल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे राज्यातील ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशांना सातव्या वेतन आयोग ( दि.01 जानेवारी 2016 पासुन ) नुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment