राज्य शासन सेवेत 24 वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांस 02 पदोन्नतीचे फायदे देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee two pramotion benefits court result ] : राज्य शासन सेवेत 24 वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांस 02 पदोन्नतीचे फायदे देण्याचे उच्च न्यायालयांकडून निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर प्रकरण  पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

एका प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ( छ.संभाजीनगर ) खंड पीठाने 24 वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांस 02 पदोन्नतीचे फायदे देण्याचा महत्वपुर्ण निकाल दिला आहे . सदर प्रकरण हे पारनेर येथील रहिवाशी असणाऱ्या गुलाम नवी मिलेमान मनियार हे नगर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक म्हणून 32 वर्षे सेवा केली आहे .

त्यांना पदोन्नती ही सलग 12 वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ मिळाला , परंतु त्यांना त्यांच्या 24 वर्षाच्या सेवेनंतर दुसरी पदोन्नती देण्यास टाळाटाळ केली , त्यानंतर ते  दिनांक 02.05.2007 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .तर राज्य शासनांने दि.01.04.2010 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार , सलग 24 वर्षे सेवा पुर्ण झालेल्यांना 02 पदोन्नतीचा लाभ देण्याचे प्रयोजन असताना ..

सरकारने दि.01.07.2011 रोजी नविन आदेश काढून 01 ऑक्टोंबर 2006 ते 31.03.2010 पर्यंत सेवा निवृत्त झालेल्या  अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा दुसरा लाभ देवू नयेत असे ठरविल्याने सदर गुलाम नवी मनियार हे पदोन्नतीपासून वंचित राहीले . यामुळे मनियार यांनी कोर्टात याचिका दाखल केली .

यावर कोर्टाने सदर मनियार यांना न्याय देत 24 वर्षे सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस 02 पदोन्नतीचे लाभ देण्याचे निकालात नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment