Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Traveling Allowance Shasan Nirnay GR ] : महाराष्ट्र राज्य शासनांच्या सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबावणी सन 2000-01 पासुन देशांमध्ये करण्यात आली . शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 18 जानेवारी 2002 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी राज्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आला .
समग्र शिक्षा योजनांच्या अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत 06 जिल्हा समन्वयक तसेच 52 विशेष तज्ञ / समावेशित शिक्षक व 158 विशेष शिक्षक असे एकुण दिव्यांग 216 कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये लागु करण्यात आलेला वाहतुक भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत . अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतुक भत्ता लागु करण्यास मासिक रुपये 6,29,100/- प्रमाणे वार्षिक रुपये 75,49,200/- रुपये इतके अतिरिक्त दायित्व निर्माण होणार आहे .
सदरचा निधी हा राज्य शासनांच्या निधीतुन राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर योजनांच्या लेखाशिर्ष मागणी क्र.2, 2202 , सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण , 106 शिक्षक व इतर सेवा , समग्र शिक्षा अभियान या लेखाशिर्षामधून भागविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत .
सदरचे दर वरील नमुद कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागु असणार आहेत , हा शासन निर्णय मा.मंत्रीमंडळाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजूरीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहेत . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.