Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee thakit deyake paripatrak ] : राज्यातील शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत , प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , राज्य शासनांच्या दिनांक 15.07.2021 रोजीच्या निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच सादर करणेबाबत , शासनाचे निर्देश आहेत . त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली आहे .
त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत , प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या दिनांक 12.09.2024 रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहेत .
तथापि सध्य – स्थितीमध्ये शालार्थ वेतन प्रणालीमध्ये , तांत्रिक अडचणी आल्याने , शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाहीत , तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान 01 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याकरीता राज्यातील काही वेतन पथक कार्यालयांकडून विनंती करण्यात आलेली आहे .
सदरच्या वस्तुस्थितीचा विचार करता DDO -1 ( मुख्याध्यापक ) यांच्या स्तरावरुन थकीत देयके हे ऑनलाईन सादर करण्याकरीता दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत ,त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीताच्या थकीत देयके हे ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.