Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee thakit deyake paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 07 ऑक्टोंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी , शिक्षण निरीक्षक , अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रति शिक्षण संचालनालय यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माध्यिमक व उच्च माध्यिमक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 25.09.2024 पर्यंत मुद देण्यात आलेली होती , तर संचालनालयाच्या दि.25.09.2024 रोजीच्या परिपत्रकानुसार , शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये , ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक .05.10.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती .

तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचाऱ्यांचे थकीत देयके हे ऑनलाईन सादर करण्यात आलेली नसल्याने वेतन पथके कार्यालयाकडून सादर करणेबाबत , मुदतवाढ देणेबाबत , विनंती केलेली आहे . सदरच्या प्रकरणी क्षेत्रिय कार्यालयांकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता डिडीओ – 1 ( मुख्याध्यापक ) स्तरावरुन थकीत देयके ..

ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 15.10.2024 अखेर अंतिम मुदत राहील , त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी जि.प / अधिक्षक वेतन पथक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करुन पात्र थकीत देयके संचालनाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *