लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : वित्त विभागाच्या दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयातील निकषास अनुसरुन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथिल नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जुलै 2021 पासून लागु करण्यासाठी राज्य सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या GR मधील अटी शर्तींच्या अधीन राहुन मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळात नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2021 पासून सातवा वेतन आयोगानुसार , सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .महाराष्ट्र राज्यस यंत्रमाग महामंडळाने वित्त विभाग / शासनाकडून सातवा वेतन आयोगा संदर्भात नियमित करण्यात आलेले दिनांक 30 जानेवारी 2019 , दिनांक 20 फेब्रुवारी 2019 , दिनांक 04 ऑगस्ट 2021 व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णय / परिपत्रकातील अटी / शर्तीचा मार्गदर्शक तत्वे म्हणून अवलंब करावा व त्याप्रमाणे सुधारित वेतश्रेणीची अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत .
तसचे सन 2019-20 पासून महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळास नफा होत असला तरी संचित तोटा निरसित होणे आवश्यक असल्याने यास्तव दिनांक 01 जुलै 2021 पासून सुधारित वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करण्यात आली आहे . तसेच दिनांक 01 जुलै 2021 ते सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करेपर्यंतच्या कालावधीतील थकबाकी ( एकरकमी अथवा टप्याटप्याने अदा करण्याबाबत संचालक मंडळाच्या मान्यतेने विभागास प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
पदांनुसार सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय होत असलेली सुधारित वेतन मॅट्रीक्स व वेतनस्तर पुढीलप्रमाणे पाहु शकता …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारक/ कुटुंबनिवृत्ती वेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !