राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारित NPS व UPS पेन्शन योजनेतील तुलनात्मक फरक ; जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee sudharit nps & ups pension scheme difference ] : राज्य शासन सेवेतील NPS धारक कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे . या दोन्ही पेन्शन योजनापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे , या दोन्ही योजनेतील नेमका कोणता फरक आहे ते जाणून घेऊयात ..

सेवेची अट : कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून , प्राप्ती करिता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान 20 वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल . तर केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान सेवा 25 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल . तरच कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल .

स्वेच्छा निवृत्ती : जर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजना या दोन्ही योजनांमध्ये पेन्शनची तरतूद ही त्याच्या सेवेच्या कालावधीनुसार केली जाईल .

महागाई भत्ता / कर्मचारी योगदान  : वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये , कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेळी चालू महागाई भत्त्याचा दराप्रमाणे अनुज्ञेय असेल . तसेच वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये , कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान कायम ठेवण्यात आले आहेत . तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारचे 14 टक्के योगदान आहे तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारचे योगदान 14 टक्के वरून 18. 5% इतके वाढविण्यात आले आहे .

किमान पेन्शन : सदर दोन्ही पेन्शन योजना सेवेच्या अटीवर अवलंबून असून , सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान 7500/- रूपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे . तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान पेन्शन 10,000/-  रुपये इतकी करण्यात आली आहे .

Leave a Comment