Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Rajapatra ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 07 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे , या संदर्भातील सविस्तर शासन राजपत्र पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 274 च्या पोट कलम 2 च्या खंड 39 द्वारे प्रदान करण्याचा अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन , महाराष्ट्र शासन या द्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम 1967 यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी उक्त कलम 274 च्या पोट कलम ( 3 ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे दिनांक 21 जुलै 2023 रोजीच्या अधिसुचनेद्वारे पुर्व प्रसिद्धी दिल्यानंतर ती अधिक्रमित करुन पुढीलप्रमाणे नियम तयार करण्यात आलेले आहेत .
नियम : सदर उक्त नियमांस महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा – सेवा प्रवेश सुधारण नियम 2024 असे म्हणण्यात येणार आहेत . तसेच सदर अधिसुचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहेत . तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 याच्या परिशिष्ट नऊ मधील ( क ) जिल्हा सेवा संवर्ग 3 – दुय्यम लिपिक वर्गीय प्रथम श्रेणी यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनु.5 येथील नोंदी मधील स्तंभ 3 मधील पद या शीर्षा खाली कनिष्ठ सहाय्यक याच्याशी संबंधित असणाऱ्या अनु.01 स्तंभ 4 मधील ( एक ) कनिष्ठ सहायक यांच्या शी संबंधित असणाऱ्या नेमणूकीकरीता अर्हता व नुमणुकीच्या पद्धती या शीर्षाखाली अ नेमणूक एक तर या खंडापुर्वी पुढील खंड ज्यादा दाखल करण्यात येईल .
तर कनिष्ठ सहाय्यक पदावरील नियुक्ती एकतर , पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर 03 वर्षांपेक्षा कमी नेसल इतकी नियमित सेवा असणाऱ्या गड ड मधील पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून पात्रतेच्या अधिन राहुन ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल आणि ज्याने कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली आहे , आणि किमान 30 श.प्र.मि इतक्या वर्ग मर्यादेचे मराठी टंकलेखनाचे अथवा 40 श.प्र.मि इतक्या वेग मर्यादेचे इंग्रजी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्यीक प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र धारण केलेले आहे .
अथवा शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार अनुकंपा तत्वावरील आणि जिने वरील खंड क च्या उपखंड 1 व 2 मध्ये विनिर्दिष्ट केलेली अर्हता धारण केलेली आहे अशा योग्य व्यक्तीच्या नियुक्तीद्वारे करण्यात येईल .
अथवा वाहन चालक गट क पदावर 3 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमिक सेवा पुर्ण केलेल्य ज्यांनी कनिष्ठ सहाय्यक पदास पसंती दर्शवली आहे आणि खंड क च्या उपखंड व 02 मध्ये नमुद केलेली अर्हता धारण करण्यात आलेले आहे अशा वाहन चालक गट क हे पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधील स्थायी संवर्गातील योग्य व्यक्तीच्या बदलीद्वारे पात्रतेस अधिन राहून ज्येष्ठतेच्या अधारे नियुक्ती करण्यात येईल . वाहन चालकांची कनिष्ठ सहायक पदावरील ज्येष्ठता , कनिष्ठ सहायक पदावर नियुक्ती केल्यानंतर रुजु झाल्याच्या दिनांकापासून निश्चित करण्यात येईल .
01.नियुक्ती , पदोन्नती , अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने आणि वाहनचालक संवर्गातील कायमस्वरुपी बदलीने अनुक्रमे 40:50:10 या प्रमाणात करण्यात येईल . परंतु जर वाहनचालक संवर्गातुन उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर सदर 10 टक्के जागा खंड क च्या उपखंड मध्ये नमुद केलेली पदोन्नतीसाठी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून भरण्यात येतील .
02.परंतु जर पदोन्नतीसाठी किंवा वाहन चालक संवर्गातून कायस्वरुपी बदलीद्वारे नमूद करण्यात आलेली अर्हता धारण करणारे योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाही तर नियुक्ती प्राधिकाऱ्यास पदोन्नतीद्वारे व वाहनचालक संवर्गातून कायमस्वरुपी बदलीद्वारे नियुक्तीकरीता सदर प्रमाणे शिथील करता येतील आणि नामनिर्देशनाद्वारे उमेदवाराची नियुक्ती करता येणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांकडून दिनांक 07 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.