MTV marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Dress Code ] : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नियमित त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणारे सर्व अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्याकरीता कार्यालयीन कामकाज करीत असताना परिधान करावयाच्य पोशाख ( ड्रेस कोड ) बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 08 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील शासकीय / कंत्राटी तत्वावरील अधिकारी / कर्मचारी आपले दैनंदिन कामकाज करीत असताना , आपला पेहराव शोभनिय असावा . तसेच परिधान करण्यात आलेला पेहराव हा व्यवस्थित ( स्वच्छ ) असावा . ज्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी साडी , ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट त्याचबरोबर त्यावर आवश्यकता असल्यास दुपट्टा असावा , सलवार / चुडीदार कुर्ता असा परिधान असावा .
तर पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्याला शोभेल असा प्रकारचे शर्ट पॅन्ट / ट्राऊझर पॅन्ट असा ड्रेस कोड परिधान करावा तर गडद रंग असणारे चित्र – विचित्र नक्षीकाम तसेच चित्रे असणारे पेहराव करु नयेत . तर पुरुष व महिला कर्मचऱ्यांनी कार्यालयांमध्ये जीन्स व टी- शर्टचा वापर करु नयेत असे नमुद करण्यात आलेले होते . परंतु शुद्धीपत्रानमुसार टी-शर्ट घालण्यास मुभा देण्यात आलेली आहे , परंतु जीन्स घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे .
खादी हे स्वदेशीचे प्रतिक असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातुन किमान एक दिवशी शक्यतो शुक्रवारी खादी कपड्याचा पेहरावा करावा . तर सदर परिधान करण्यात आलेला पेहराव हा निटनेटका तसेच स्वच्छ असण्याची दक्षता कर्मचाऱ्यांनी घ्यायची आहे .तसेच परिधान करण्यात आलेल्या पेहरावा मध्ये दर्शनी भागांमध्ये ( दिसेल अशा पद्धतीने ) आपले ओळखपत्र धारण करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
पुरष कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करीत असताना , शक्यता सॅन्डल , शुज ( बुट ) तर महिला कर्मचाऱ्यांनी शक्यतो चपल , शुज , सॅन्डलांचा वापर करावा .
सदरच्या सुचना ह्या राज्यातील सर्व कंत्राटी अधिकारी / कर्मचारी तसेच मंत्रालयीन विभागातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर महामंडळे / उपक्रम यांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागु असणार आहेत .
या संदर्भात सा.प्र.विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !