Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील लाखो शासकीय , निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी सेवाविृत्तीचे वय 60 वर्षे होण्याच्या प्रतिक्षेत आहेत . सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या मंत्रालयीन स्तरावर कुठंपर्यंत कार्यवाही करण्यात येत आहेत , या संदर्भातील माहिती पुढीप्रमाणे पाहुयात ..

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यानंतर इतर 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षेांची वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे झालेली आहे . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याची मोठी मागणी होत आहे .

यापुर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांने सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत वेळोवेळी राज्य सरकारला निवेदन देण्यात आलेले आहेत , परंतु राज्य शासनांकडून वेळोवेळी केवळ आश्वासने व वेळीचं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातात . परंतु यावर उचित कार्यवाही अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही .

माहे नोव्हेंबर महिन्यांत राज्याचे महासचिव यांच्या सोबत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत , महासचिव यांनी सांगितले होते कि , राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन असून , प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .अशी माहिती देण्यात आलेली होती .अनेक कर्मचारी दिवसेंदिवस सेवानिवृत्त होत आहेत , यामुळे राज्य शासनांकडून सेवानिवृत्तीच्या वयांबाबत निर्णय घेण्याच्या अगोदरच अनेक कर्मचारी वंचित होत चालले आहेत .

मंत्रालयीन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02वर्षांची वाढ करणेबाबत कार्यवाहीचा विचार केला असता , हिवाळी अधिवेशांमध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा अधिक मोठा असल्याने सेवानिवृत्तीच्या वयांकडे राज्य शासनांचे लक्ष वेधले गेले नाही. परंतु जुनी पेन्शननंतर सर्वात मोठी मागणी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , अनेक कर्मचारी संघटनांनी राज्य शासनांस निवेदने सादर करण्यात आलेले आहेत .

यामुळे येत्या अर्थसंकल्पांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , विचार केला जावू शकतो , कारण यावर्षी राज्य शासन सेवेत 75,000 पदांकरीता पदभरती करण्याचा संकल्प राज्य शासनांकडुन करण्यात आलेला होता , परंतु हा टप्पा राज्य शासनांकडून गाठला नाही . रिक्त पदांचा आकडा पाहीला तर 2.50 लाख एवढा आहे . यामुळे सदर रिक्त पदांची तुट भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येतील .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *