Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee Retirement Age Increase Big Update News ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत येत्या हिवाळी अधिवेशांमध्ये मोठा निर्णय होवू शकतो , कारण राज्य शासन स्तरावर याबाबत मोठी हालचाली सुरु आहेत .
हिवाळी अधिवेशांमध्ये चर्चेसाठी घेण्यात येणाऱ्या विषयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन तोडगा काढण्यात येणार आहे . यांमध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करणे त्यानंतर दुसरा मोठा महत्वपुर्ण मुद्दा म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणे . कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर राज्य शासनांकडून विशेष कार्यवाहीची बाब विचाराधीन आहे .
कर्मचाऱ्यांच्या अनेक मागणी कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी शासन दरबारी मांडल्या आहेत , येत्या 12 डिसेंबर 2023 रोजी अधिवेशावर राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी नागपुर येथे दाखल होणार आहेत .
कारण देशांमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयानंतर इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केली आहे . यामुळे राज्य शासनांकडून निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ लागु करणेबाबत मोठा निर्णय या अधिवेशांत होवू शकतो .
सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून प्रस्ताव तसेच अधिवेशन दरम्यान सविस्तर आकडेवारी गोळा करण्यात आलेली असून , अधिवेशनात याबाबत नेमका कोणता निर्णय होईल . याकडे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !