लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार [ GR ] शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबचा शासन निर्णय दि. १७.१२.२०१६ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासनातील तरतूदीनुसार करार पध्दतीने नेमणूक करताना अशा नियुक्तीच्या वेळी महागाई भत्त्यासह मिळत असलेल्या निवृत्तीवेतनाएवढी रकम (अंशराशीकृत निवृत्तीवेतन वगळून) त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात येते.
सदर शासन निर्णयानुसार निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण केलेल्या अधिकाऱ्यांच्या / कर्मचाऱ्यांच्या मानधनाची परिगणना करताना निवृत्तीवेतनातून अंशराशीकृत मूल्य वजा केले जाते असते , तथापि अंशराशीकरण न केलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संपूर्ण निवृत्तीवेतनाची रक्कम मानधन निश्चित करताना विचारात घेतली जाते. म्हणुन समान सारखे शेवटचे वेतन घेत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना करार पद्धतीने नियुक्ती दिल्यास त्यांचे परिश्रमिक वेतन हे वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित करणयात येत असते .
त्याचबरोबर काही कारणांमुळे अंतिम निवृत्तीवेतन निश्चित होण्यास विलंब झाल्यास तात्पुरत्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनावर ( शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम ) मासिक पारिश्रमिक वेतन निश्चित करण्यात येत असते म्हणुनच अंशराशीकृत मुल्य हे वजा करावे अथवा कसे करावेत याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे वेळोवेळी विचारण करण्यात येत असते . यास्तव, उक्त शासन निर्णयातील तरतूदीमध्ये मासिक पारिश्रमिकाची व भत्त्यांची परिगणना करताना अंशराशीकृत निवृत्तीवेतन न वगळता मासिक पारिश्रमिक निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यानुसार आता राज्य शासनांकडून असा निर्णय घेण्यात आला आहे कि , शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबतच्या शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. १७.१२.२०१६ मधील परिच्छेद २ येथील (ड) (१) (क) मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-
मासिक पारिश्रमिक व भत्ते – मासिक पारिश्रमिक , शासकीय / निमशासकीय सेवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विहीत कार्यपध्दतीचे पालन करुन करार पध्दतीने नेमणूक करतांना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी मिळत असलेले मुळ निवृत्तीवेतन (अंशराशीकरण मुल्य विचारात न घेता) व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या रकमेएवढी रक्कम त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे आणि एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पध्दतीने नियुक्तीच्या कालावधीसाठी (जास्तीत जास्त ३ वर्षे) कायम असणार आहे . .
वरीलप्रमाणे सुधारणा सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे .मासिक परिश्रमिकाची व भत्यांची परिगणना पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहेत , या संदर्भात पुढीलप्रमाणे उदाहरण देण्यात आले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 08.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !